पोस्ट्स

सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवांचे पेव!

इमेज
सत्यता पडताळूनच पोस्ट, शेअर वा फॉरवर्ड करा कोरोना विषाणूच्या संकटाला परतवून लावण्यासाठी राज्य सरकार , प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता अहोरात्र कार्यरत आहे , तर दुसरीकडे सोशल मीडियावर कोरोना विषाणूच्या संदर्भात अफवा आणि चुकीच्या माहितीचा अक्षरक्षः महापूर आला आहे , कोणतीही माहिती पोस्ट , शेअर किंवा फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .   ‘ कोरोना विषाणू ॲण्टिबायोटिक्स , पॅरासिटेमॉल घेतल्याने तसेच कारल्याचा रस पिल्याने बरा होतो ’, ‘ डास , मच्छर चावल्याने कोरोना विषाणू पसरतो ’, ‘ केंद्र सरकारने पीएम मास्क योजना सुरू केली आहे , अमूक एका लिंकवर क्लिक करा आणि फ्री मास्क मिळवा ’, ‘ रात्री 11 ते पहाटे 5 च्या दरम्यान भारत सरकार कोरोना व्हायरसवर विमानाद्वारे गॅस व्हॅक्सिन फवारणार असून घराबाहेर पडू नका ’, ‘ संपूर्ण देश लॉकडाऊन होणार आहे ’ ‘ कोरोना रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटल्सची यादी ’, ‘ महाराष्ट्र , गुजरात ...