लोकाभिमुख निर्णय, शासकीय कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी जळगाव जिल्हा माहिती कार्यालय ‘फेसबुक’वर...
२१०० लाईक्सचा टप्पा ओलांडला ; नेटकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव, दि.४- राज्य शासनाचे विविध लोकाभिमुख निर्णय, शासकीय कार्यक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने ‘फेसबुक’ पेज तयार केले असून या पेजला अल्पावधीतच २१०० पेक्षा अधिक लाईक्स देऊन जळगावकरांनी पसंती दिली आहे. सोशल नेटवर्किंग साईटसची लोकप्रियता आणि वाढता वापर लक्षात घेऊन आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या सोशल मिडीयाचा अधिकाधिक वापर करण्याच्या आवाहनावर जिल्हा माहिती अधिकारी किशोर गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून जिल्हा माहिती कार्यालयाचे स्वतंत्र फेसबुक पेज ( www.facebook.com/jalgaon.dio ) तयार करण्यात आले आहे. जिल्हाभरात होणारे विविध शासकीय कार्यक्रम, पालकमंत्री ना. श्री. एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या मान्यवरांच्या कार्यक्रमांचे अचूक वृत्त व दर्जेदार छायाचित्रे माध्यमांपर्यंत तसेच जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या फेसबुक पेजचा चांगला उपयोग...