स्पर्धा परीक्षांच्या पूर्वनियोजनासाठी एमपीएससीचे २०१६ चे वेळापत्रक जाहीर
प्रशासनात जाण्याचा एक महत्त्वाचा राजमार्ग म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पाहिले जाते. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) असो वा कर्मचारी निवड मंडळ (एसएससी) या सारख्या संविधानिक संस्थांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा युवकांच्या जीवनातील टर्निंग पॉईन्ट ठरतात. या स्पर्धा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी त्याचे पूर्वनियोजन आणि पूर्वतयारीही नेहमीच आवश्यक असते, म्हणून दरवर्षी यूपीएससी, एमपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करीत असते. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही २०१६ या वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाचे वेळापत्रक जाहीर केले असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ते निश्चितच उपयुक्त ठरेल. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६ (१) अन्वये प्रत्येक नागरिकाला नागरी सेवेतील नोकरभरतीकरिता समान संधी मिळण्याबाबतचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. भारताचे नागरिक हे बहुभाषिक व विविध धर्माचे असून त्यात मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक बांधवांचा देखील समावेश आहे. त्यामुळे नागरी सेवेतील नोकरी भरती...