स्पर्धा परीक्षांच्या पूर्वनियोजनासाठी एमपीएससीचे २०१६ चे वेळापत्रक जाहीर


प्रशासनात जाण्याचा एक महत्त्वाचा राजमार्ग म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पाहिले जाते. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) असो वा कर्मचारी निवड मंडळ (एसएससी) या सारख्या संविधानिक संस्थांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा युवकांच्या जीवनातील टर्निंग पॉईन्ट ठरतात. या स्पर्धा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी त्याचे पूर्वनियोजन आणि पूर्वतयारीही नेहमीच आवश्यक असते, म्हणून दरवर्षी यूपीएससी, एमपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करीत असते. नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही २०१६ या वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाचे वेळापत्रक जाहीर केले असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ते निश्चितच उपयुक्त ठरेल.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६ (१) अन्वये प्रत्येक नागरिकाला नागरी सेवेतील नोकरभरतीकरिता समान संधी मिळण्याबाबतचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. भारताचे नागरिक हे बहुभाषिक व विविध धर्माचे असून त्यात मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक बांधवांचा देखील समावेश आहे. त्यामुळे नागरी सेवेतील नोकरी भरतीकरिता समानतेची संधी प्रत्येक नागरिकाला मिळावी आणि ही नोकरभरती कोणताही दबाव, वैयक्तिक हितसंबंध यापासून अलिप्त राहावी आणि नागरी सेवेत सुयोग्य, पात्र उमेदवारांची गुणवत्तेवर निःपक्षपातीपणे निवड व्हावी याउद्देशाने अनुच्छेद ३१५ अन्वये राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाने केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे त्यापैकीच एक...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, सहायक विक्रीकर आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, मुख्याधिकारी नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तहसीलदार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लेखा अधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमि अभिलेख, उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, नायब तहसीलदार आदी गट ‘अ’ आणि ‘ब’ च्या पदांसाठी राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. त्याशिवाय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा, कृषिसेवा परीक्षा, वनसेवा परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, सहायक परीक्षा, तांत्रिक सहायक परीक्षा, कर सहायक परीक्षा, लिपिक टंकलेखक परीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा आदी परीक्षा घेतल्या जातात. या स्पर्धा परीक्षांची युवकांना पूर्वतयारी करता यावी, यशस्वी होण्यासाठी पूर्वनियोजन करता यावे याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१६ या वर्षातील अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक...

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१५
§  जाहिरात- ऑगस्ट २०१५
§  पूर्व परीक्षा- २५ऑक्टोबर रोजी झाली आहे.
§  मुख्य परीक्षा- ९ व १० जानेवारी २०१६

राज्य सेवा परीक्षा २०१६
§  जाहिरात- डिसेंबर २०१५
§  पूर्व परीक्षा- १० एप्रिल २०१६
§  मुख्य परीक्षा- २४,२५ व २६ सप्टेंबर २०१६


तांत्रिक सहायक परीक्षा २०१६
§  जाहिरात- डिसेंबर २०१५
§  मुख्य परीक्षा- ६ मार्च २०१६

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा २०१६
§  जाहिरात- जानेवारी २०१६
§  पूर्व परीक्षा- ३ एप्रिल २०१६
§  मुख्य परीक्षा- १४ ऑगस्ट २०१६


लिपिक-टंकलेखक परीक्षा २०१६
§  जाहिरात- मार्च २०१६
§  मुख्य परीक्षा- ८ मे २०१६

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१६
§  जाहिरात- मार्च २०१६
§  पूर्व परीक्षा- २२ मे २०१६
§  मुख्य परीक्षा- २४,२५ सप्टेंबर २०१६

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०१६
§  जाहिरात- मार्च २०१६
§  पूर्व परीक्षा- ५ जून २०१६
§  मुख्य परीक्षा- ९ ऑक्टोबर २०१६

कर सहायक परीक्षा२०१६
§  जाहिरात- एप्रिल २०१६
§  मुख्य परीक्षा- १७ जुलै २०१६

सहायक परीक्षा २०१६
§  जाहिरात- एप्रिल २०१६
§  पूर्व परीक्षा- ३१ जुलै २०१६
§  मुख्य परीक्षा- ६ नोव्हेंबर २०१६

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा २०१६
§  जाहिरात- एप्रिल २०१६
§  पूर्व परीक्षा- १० जुलै २०१६
§  मुख्य परीक्षा- १८डिसेंबर २०१६

पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१६
§  जाहिरात- मे २०१६
§  पूर्व परीक्षा- २८ ऑगस्ट २०१६
§  मुख्य परीक्षा- ११ डिसेंबर २०१६

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१६
§  जाहिरात- जून २०१६
§  पूर्व परीक्षा- २१ ऑगस्ट २०१६
§  मुख्य परीक्षा- १७ नोव्हेंबर २०१६

विक्रीकर निरीक्षक परीक्षा २०१६
§  जाहिरात- जुलै २०१६
§  पूर्व परीक्षा- १६ ऑक्टोबर २०१६
§  मुख्य परीक्षा- फेब्रुवारी २०१७

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या किंवा बसू इच्छिणाऱ्यांना उमेदवारांना अधिक चांगले नियोजन आणि तयारी करण्यासाठी  स्पर्धा परीक्षांचे २०१६ या वर्षाचे संभाव्य वेळापत्रक निश्चितच लाभदायी ठरणार आहे.  
-किशोर गांगुर्डे, मुंबई


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर