‘डिजिटल’ महाराष्ट्रासाठी सायबर सुरक्षेवर भर देणारा ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प’
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्या दैनंदिन जीवनाचा बहुतांशी भाग हा माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित सेवांनी व्यापला आहे . माहिती तंत्रज्ञान सेवांच्या प्रसारातून सहज सुविधा निर्माण होत असल्या तरी त्यातून ‘ सायबर ’ सुरक्षेशी संबंधित उद्भवणाऱ्या समस्या देखील काही कमी नाहीत . सायबर सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे . महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत राज्यात विविध 51 ठिकाणी अत्याधुनिक ‘ सायबर सेल ’ स्थापन करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे . उद्या , दि . 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी एकाच दिवशी पहिल्या टप्प्यात 42 सायबर लॅबचा राज्यभरात शुभारंभ होत असून यानिमित्ताने ‘ सायबर सुरक्षे ’ वर टाकलेला दृष्टिक्षेप … माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन व्यापार तसेच इतर अनेक व्यवहार करणे आपल्याला सोईस्कर झाले आहेत . एकीकडे या सुविधा सहज मिळत असल्या तरी त्याचा गैरवापर करुन सायबर गुन्हे करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे . हॅकिंगच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार आणि ...