डिजिटल मार्केटिंग; करियरसंधींचे अनोखे क्षेत्र (भाग-२)
जगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसागणिक वाढत चालला असून आपल्या दैनंदिन आयुष्याचा बहुतांशी भाग डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापून टाकला आहे. २०२० पर्यंत संपूर्ण जग डिजिटल होईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हे होत असतानाच डिजिटल मार्केटिंगच्या पर्यायाने सोशल मीडियाच्या क्षेत्रातदेखील रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत आहेत. पहिल्या भागात डिजिटल मार्केटींग म्हणजे काय, त्याचे घटक त्या क्षेत्रातील संधी आपण पाहिल्या. आता आपण बघणार आहोत या क्षेत्रातील कामाचे स्वरुप, जबाबदारी, आवश्यक पात्रता, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आदींची माहिती. कामाचे स्वरुप, जबाबदारी - डिजिटल मार्केटिंग डायरेक्टर/मॅनेजर डिजिटल मार्केटिंग डायरेक्टर किंवा मॅनेजर हे एक वरिष्ठ पद आहे. डिजिटल मार्केटिंग मधला किमान ५-७ वर्षांचा अनुभव असलेला व्यक्ती या पदावर काम करु शकतो. डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन्सचे नियोजन, वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नियमित अपडेट करण्याची महत्त्वाची जबाबदारी यांची असते. वेब डेव्हलपर आणि वेब डिझाईनर आकर्षक, दर्जेदार वेबसाईट बनविण्याची महत्त्वा...