नाशिक : नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याच तयारीची आणि सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन ‘सिंहस्थ संवाद’ या विशेष मालिकेचे प्रसारण 20 जुलै 2015 पासून करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती असलेली ‘सिंहस्थ संवाद’ ही विशेष मालिका 20 जुलैपासून दररोज सकाळी 8.55 ते 9.10 वाजता या वेळेत प्रसारित होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रशासनाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध सुविधांची उभारणी केली आहे. कायमस्वरुपी कामे पूर्ण झाली असून तात्पुरती कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. कुंभमेळा सुरु झाल्यानंतरच्या काळात साधू-महंत आणि भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचे सूक्ष्म नियोजन प्रशासनाच्या विविध यंत्रणांनी केले आहे. या सर्व पूर्व तयारीची आणि निर्माण करण्यात आलेल्या सुविधांची माहिती संबंधित विभाग, यंत्रणांचे प्रमुख जनतेला आकाशवाणीच्या ‘सिंहस्थ संवाद’ मालिकेतून देणार आहेत. सोमवार, 20 जुलै रोजी सकाळी 8.55 वाजता ‘सिंहस्थ संवाद’ या मालिकेच्या प्रस...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा