भाविकांना स्नानासाठी मार्गनिहाय स्वतंत्र घाट
नाशिक येथे सात तर त्र्यंबकेश्वरात
तीन आकर्षक घाटांची उभारणी
सिंहस्थ
कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून यावर्षी भाविकांची वाढती गर्दी
लक्षात घेऊन प्रशासनाने मुख्य पर्वणीच्या स्नानासाठी
स्वतंत्र घाटांचे नियोजन केले आहे. या
स्वतंत्र घाटांमुळे भाविकांना शांततेत आणि विनासायास स्नान करणे सुकर होणार आहे. नाशिक
येथील सात आणि त्र्यंबकेश्वर येथील तीन घाटांवर स्नानासाठी येणारे भाविक
प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांवरुनच येणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करणे
सोपे होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी देश-विदेशातील
लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरला येतात. पारंपारिक शाही स्नानाचे
ठिकाण असलेल्या नाशिकच्या गंगाघाटावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर यावर्षी
पर्वणीच्या काळात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून नाशिक शहरात 7 आणि
त्र्यंबकेश्वर येथे तीन घाटांवर स्नानाचे नियोजन केले आहे. नाशकात
रामकुंड,
गौरी पटांगण, टाळकुटेश्वर, लक्ष्मीनारायण, टाकळी संगम, नांदूर आणि दसक पंचक या सात
रामघाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर
त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या घाट, आचार्य श्री श्री चंद्र घाट, गोरक्षनाथ
या तीन घाटांवर भाविकांना स्नान करता येणार आहे.
नाशिक
येथे स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचे मार्ग व्यवस्थापन…
§ राष्ट्रीय
महामार्ग 3 वरुन धुळे, जळगाव, इंदौर,आग्रारोडकडून
येणारे भाविक आडगाव शिवार बाह्य वाहनतळ येथे आपली
वाहने पार्क करतील. तेथून
त्यांना बसने निलगिरी बाग येथील अंतर्गत
वाहनतळापर्यंत जावे लागेल. निलगिरीबाग येथून भाविकांना नांदूर-मानूर रामघाट
आणि टाकळी संगम रामघाटावर स्नानासाठी जाण्याचे दोन पर्याय आहेत.
1)
नांदूर-मानूर रामघाट- निलगिरी
बाग येथे आलेले भाविक हे पायी औरंगाबाद
रोडच्या उजव्या बाजूने नांदूरनाकामार्गे नांदूर-मानूर रामघाटावर स्नानास जातील. स्नान
उरकून मानूरगाव, हंबरेवस्ती मानूर फाटा, औरंगाबादरोडच्या उजव्या बाजूने
नांदूरनाका-औरंगाबाद रोडने निलगिरी बागच्या अंतर्गत वाहनतळावर भाविकांना पोहोचता
येईल.
2)
टाकळीसंगम रामघाट- निलगिरी बाग येथे आलेले भाविक औरंगाबाद रस्ता ओलांडून पवारमळा,
सानपडेअरी, नवीन एसटीपी पुलावरुन एसटीपी फिल्ट्रेशन प्लाण्टचे बाहेरील रस्त्याने
टाकळी संगम रामघाटावर पोहोचतील. स्नान उरकून भाविक हे घाटाचे पश्चिम बाजुच्या
रॅम्पने टाकळी संगम पुलावरुन नविन रोडने गोदावरी मंगल कार्यालय ते जेजुरकर मळा-औरंगाबाद
रोड मिर्ची धाबा-औरंगाबाद रोड क्रॉस करुन डाव्या बाजूस असलेली बाग निलगिरी बाग एस.टी.बस
अंतर्गत वाहनतळावर येतील.
§ औरंगाबाद, निफाड, येवल्याकडून येणारे
भाविक माडसांगवी गायरानक्षेत्रातील बाह्य
वाहनतळावर आपली वाहने थांबवतील तर ओढा रेल्वे स्थानकावर रेल्वेने आलेले भाविक एसटी
बसने माडसांगवी बाह्य वाहनतळावर येतील. तेथून एस.टी. बसने औरंगाबाद रोड- महापालिका कमान
अंतर्गत वाहनतळापर्यंत येतील. येथून भाविकांना
नांदूर-मानूर रामघाट आणि टाकळी संगम रामघाटावर स्नानासाठी जाण्याचे दोन पर्याय
आहेत.
1)
नांदूर-मानूर रामघाट- महापालिका
कमान अंतर्गत वाहनतळापासून पायी रस्त्याच्या उजव्या बाजुने नांदुर नाका डावीकडे वळुन
नांदुर-मानुर रामघाटावर स्नानासाठी जातील.
स्नानानंतर हे भाविक मानुर गावातुन हंबरे वस्ती मार्गे मानुर गाव फाटा उजवीकडे
वळुन औरंगाबाद रोडने नाशिक महापालिका कमान अंतर्गत वाहनतळाच्या ठिकाणी जातील तेथून एस.टी. बसने औरंगाबाद
रोड- मांडसांगवी गायरान क्षेत्र बाहय वाहनतळाच्या ठिकाणी जातील.
2)
टाकळीसंगम रामघाट- महापालिका कमान अंतर्गत वाहनतळावर
आलेले भाविक पायी औरंगाबाद रोड क्रॉस करुन-पवार मळा-सानप डेअरी-नविन एसटीपी पुलावरुन
एसटी पी फिल्ट्रेशन प्लॅन्टचे बाहेरील रस्त्याने टाकळी संगम रामघाट येथे स्नान करतील.
स्नानानंतर हे भाविक घाटाचे पश्चिम बाजुच्या रॅम्पने टाकळी संगम पुलावरुन नविन रोडने
गोदावरी मंगल कार्यालय ते जेजुरकर मळा- औरंगाबाद रोड क्रॉस करुन महापालिका कमान अंतर्गत
वाहनतळापर्यंत येतील.
§ पुण्याकडून येणाऱ्या
भाविकांना मोहगाव व चिंचोली शिवारातील
बाह्य वाहनतळावर वाहने थांबवावी लागतील तेथून सिन्नर फाटा मार्केटयार्डच्या
अंतर्गत वाहनतळापर्यंत एस.टी. बसने
जावे लागेल. तेथून पायी डाव्या बाजूने
उड्डाणपूलाच्या खालून शिवाजी पुतळा, बिटको सिग्नल, डाव्या
बाजूने जेलरोड, करन्सी
नोट प्रेस, सैलानी
बाबा दर्गा चौकातून पुढे जाऊन दसक
रामघाटावर स्नान करावे लागेल.
§ नाशिकरोड
स्टेशन येथे रेल्वेने प्लॅटफॉर्म
चार क्रमांकावर आलेले प्रवाशी सिन्नर फाटा येथे येऊन पुढे बिटको
चौकातून बिटको सिग्नल,जेलरोड मार्गे दसक रामघाटावर जाऊन स्नान करतील. स्नानानंतर
भाविक निश्चित केलेल्या विविध मार्गांवरुन जेलरोडकडे येतील. या तेथून सैलानी बाबा दर्गा, जेलरोड पाण्याची
टाकी, कोठारी कन्या शाळा, बिटको सिग्नल, नाशिकरोड पोलीस स्टेशनसमोरुन
उड्डाणपूलाच्या डाव्या बाजूच्या रॅम्पने सिन्नर फाटा मार्केटयार्डच्या अंतर्गत
वाहनतळावर येतील. तेथून एसटी बसने मोहगाव/चिंचोली येथील बाह्य वाहनतळावर जाता येईल.
रेल्वेने आलेले प्रवासी दसक रामघाटावर स्नान करुन विविध तीन पर्यायी मार्गांनी
बिटको सिग्नल, अनुराधा थिएटरसमोरुन देवळाली गाव, मालधक्का रोडने रेल्वे स्थानकावर
पोहोचतील.
§ मुंबई, इगतपुरी, घोटीकडून येणाऱ्या
भाविकांना राजूरबहुला / विल्होळी
येथील बाह्य वाहनतळांवर आपली वाहने थांबवावी लागतील. तेथून एस.टी. बसने
मुंबई नाका महामार्ग बसस्थानकाच्या अंतर्गत वाहनतळावर पोहोचावे
लागेल. तेथून वडाळा नाका चौफुली, एनडीसीसी बॅंक, द्वारका सर्कल, हॉटेल मथुरा,
टाकळी फाटा, घोडेस्वार पीरबाबा दर्गा, टाकळी रोडने पुढे पटेल टाईल्स, मारुती फरसाण
कंपनीच्या मागील बाजूने हाजी मिठाईसमोरुन गंगापात्रात जाणाऱ्या रॅम्पवरुन
लक्ष्मीनारायण रामघाटावर भाविक स्नान करतील. स्नान करुन भाविक पॅरीना आईस्क्रिम
मार्ग, एमएसईबी उपकेंद्राजवळील प्लॉटच्या रस्त्याने गोदावरी एमआयडीसी मार्गावर
येतील आणि कोठावदे ट्रेडिंग कंपनी समोरुन मुंबईरोडने महामार्ग एसटी बसस्टॅण्डकडे
जातील. त्याशिवाय स्नानानंतर भाविकांना अमृतविनायक हॉस्पिटल, काशीमाळी मंगल
कार्यालयासमोरुन कोठावदे ट्रेडिंग कंपनीसमोरुन मुंबईरोडने महामार्ग बसस्थानकावर पोहोचता
येईल. तेथून बसने राजूरबहुला बाह्य वाहनतळावर जावे लागेल.
§ त्र्यंबकेश्वरकडून
येणारे
भाविक हे एसटी बसने सातपूर बसस्टॅण्ड - आयटीआय सिग्नल-अेबीबी सर्कल- मायको सर्कल उजवीकडे
वळुन -चांडक सर्कल-उजवीकडे वळुन सुयश हॉस्पीटल मार्गे-महामार्ग जवळील टॅक्सी स्टॅण्ड
जवळ येतील. व तेथून पायी मार्गे महामार्ग बसस्टॅण्ड मधुन-साहेबा हॉटेल जवळील रस्त्याने
मुंबई नाका सर्कल आग्रारोडचे उजवे बाजुकडील सर्व्हिस रोडने राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालया
समोरुन -ऋणानुंबध मंगल कार्यालय -हॉटेल साई पॅलेस-कांदा बटाटा भवन- हनुमान मंदिर- हॉटेल
व्दारका- हॉटेल मथुरा- टाकळी फाटा- उजवीकडे वळुन -शंकर नगर चौक-तिगरानिया भिंती जवळुन
गोदावरी एमआयडीसी रोडवरील पटेल टाइल्स- मारुती फरसाण कंपनीच्या मागील बाजुनी-हाजी मिठाई
कारखान्या जवळील रॅम्पने लक्ष्मीनारायण रामघाटावर स्नानासाठी जातील. स्नान
करुन भाविक पॅरीना आईस्क्रिम मार्ग, एमएसईबी उपकेंद्राजवळील प्लॉटच्या रस्त्याने
गोदावरी एमआयडीसी मार्गावर येतील आणि कोठावदे ट्रेडिंग कंपनी समोरुन मुंबईरोडने
महामार्ग एसटी बसस्टॅण्डकडे जातील. किंवा हे भाविक अमृतविनायक हॉस्पीटल-काशी
माळी मंगल कार्यालया समोरुन गोदावरी एमआयडीसी मार्गावर येतील व कोठावदे ट्रेडिंग कंपनी
समोरुन मुंबई आग्रारोडचे डावे बाजुने महामार्ग एसटी बसस्टॅण्डकडे जातील.
§ त्र्यंबकरोडने पायी येणारे भाविक स्नानासाठी
रोकडोबा मैदान आणि गौरी पटांगण येथे जाऊ शकतात.
1)
रोकडोबा
मैदान- रस्त्याच्या डाव्या बाजुने पपाया नर्सरी चौफुली-श्रीराम चौक-महेंद्रा
सर्कल-सकाळ सर्कल-अेबीबी सर्कल- भवानी सर्कल-हॉटेल राजदुत समोरुन ठक्कर एसटी स्टॅण्ड
- मेळा बसस्टॅण्ड सीबीएस सिग्नल-शिवाजी रोडचे डावे बाजुने -दिपसन्स कॉर्नर- नेहरु गार्डन-
उजव्या बाजुने मर्चंट बॅकेजवळुन राजे बहाद्दर हॉस्पीटल-टेम्पो स्टॅण्ड -महात्मा गांधी
रोडने धुमाळ पॉइंट- नेहरु चौक-दिल्ली दरवाजा-रोकडोबा मैदानावर स्नानासाठी जातील. स्नानानंतर
हे भाविक नाव दरवाजा- बुधा हलवाई- गा.म. पुतळा- शालीमार- शिवाजी रोड- सीबीएस सिग्नल-
मेळा बसस्टॅण्ड- ठक्कर बस स्टॅण्ड- त्र्यंबक रोडचे डाव्या बाजुने मायको सर्कल -अेबीबी
सर्कल-आयटिआय सिग्नल-सकाळ सर्कल-महेंद्र सर्कल मार्गे त्र्यंबक कडे जातील.
2)
गौरी
पटांगण-रोकडोबा सांडव्या वरुन पुढे गौरी पंटागणात भाविकांना स्नान
करता येईल. गौरी पंटागणावर स्नान झालेले भाविक हे नविन शाही मार्गाने टाळकुटेश्वर पुल
-सितळादेवी -कुंभारवाडा- शिरीश कुमार चौक- मधली होळी मार्गे -बुधा हलवाई चौक- गा.म.
पुतळा- शालीमार- शिवाजी रोड- सीबीएस सिग्नल- मेळा बसस्टॅण्ड- ठक्कर बस स्टॅण्ड- त्र्यंबक
रोडचे डाव्या बाजुने मायको सर्कल -अेबीबी सर्कल-आयटिआय सिग्नल-सकाळ सर्कल-महेंद्र सर्कल
मार्गे त्र्यंबक कडे जातील.
§ गिरणारे,
दुगावफाटा व पेठरोडने येणाऱ्या भाविकांना पेठरोडच्या
ठक्कर मैदान बाह्य वाहनतळावर आपली वाहने थांबवावी लागतील. तेथून एसटी बसने
किशोर सुर्यवंशी मार्गाने आरटीओ कॉर्नर आरटिओे ऑफिस समोरुन पेठरोड शरद पवार मार्केट
यार्ड चौफुली उजव्या बाजुने मखमलाबाद रोड-ड्रिम कॅसल चौफुली उजवे बाजुने चव्हाण मळा-
हनुमानवाडी रोड- चौघुले पेट्रोल पंप- इंद्रप्रस्थ पुल ते जुना गंगापूर नाका- डोंगरे
वसतीगृह मैदान येथील अंतर्गत सीटी बसस्टॅण्ड येथे येतील. व तेथून पायी मार्गे गंगापूर
रोडचे उजवे बाजुने अशोकस्तंभ- रविवार कांरजा-बोहरपट्टी- सराफ बाजार- भांडी बाजार रोडने-
रामसेतु पुलाच्या डाव्या बाजुने निळकंठेश्वर मंदिर, यशवंतराव महाराज पटांगण घाट व गांधी
तलाव घाटावर स्नानासाठी जातील. स्नान झाल्यानंतर विविध
चार मार्गांनी भाविकांना हनुमान मंदिरापर्यंत पोहोचता येईल. तेथून पुढे घारपुरे घाटाने, जनावरांचा दवाखाना,
गंगापूर रोडच्या उजव्या बाजूने पोलीस आयुक्तालयासमोरुन डोंगरे वसतीगृहाच्या
अंतर्गत वाहनतळावर पोहोचतील. तेथून पुढे बसने ठक्कर मैदान येथील बाह्य वाहनतळावर जाता
येईल.
§ गुजराथकडून
किंवा दिंडोरी रोडमार्गे येणाऱ्या भाविकांना म्हसरूळ शिवारात
बाह्य वाहनतळावर वाहने पार्क करावी लागतील. तेथून एस.टी.बसने मुंबई-आग्रा
रोडवरील हनुमाननगर, के.के. वाघ इंजिनियरींग कॉलेजसमोरील अंतर्गत वाहनतळापर्यंत यावे
लागेल. पुढे पायी मार्गाने के.के.वाघ कॉलेजसमोरील उड्डाणपूलाच्या डाव्या बाजूच्या
रॅम्पने कन्नमवार पूल, द्वारका सर्कल, आग्रारोडने एनडीसीसी बॅंकेच्या पुढे, उजव्या
बाजूस, जिल्हा दूधसंघासमोर उजव्या बाजूला वळून हॉटेल गोदावरीच्या बाजूकडील रॅम्पने
खाली उतरुन आग्रारोडने द्वारका सर्कल पास करुन उड्डाणपूलाखालून आग्रारोडच्या
डाव्या बाजूने ट्रॅक्टर हाऊससमोरुन कन्नमवार पूलाच्या डाव्या बाजूच्या रॅम्पने
टाळकुटेश्वर रामघाटावर स्नानासाठी जाता येईल. स्नानानंतर भाविकांना पुढे
शितलादेवी, ट्रॅक्टर हाऊससमोरुन सर्व्हिस रोडने डॉ. जाकिर हुसेन हॉस्पिटल, द्वारका उड्डाण पुलाच्या रॅम्पने
उड्डाणपुलावरुन के.के.वाघ
इंजिनिअरींग कॉलेज समोरील अंतर्गत वाहनतळापर्यंत
पोहोचावे लागेल.तेथून त्यांना बसने म्हसरुळ बाह्य वाहनतळावर पोहोचता येईल.
त्र्यंबकेश्वर
येथील घाटांवर स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांचे मार्ग व्यवस्थापन…
नाशिकप्रमाणेच
त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी देखील अतिशय सुव्यवस्थित नियोजन केले
असून त्यामुळे गर्दी व्यवस्थापनाबरोबरच सर्व भाविकांना दर्शन, स्नान
आदी करणे सुलभ होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन घाट आहेत.
§ नाशिककडून
त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांसाठी
खंबाळे येथे बाह्य वाहनतळ उभारण्यात आले असून तेथून एस.टी. बसने भाविक ब्रम्हा व्हॅलीच्या
अंतर्गत वाहनतळापर्यंत येतील. तेथून पुढे पायी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या उजव्या
बाजूने, तुपादेवी, पेगलवाडी फाटामार्गे येऊन पुढे आचार्य श्री श्री चंद्र घाटावर स्नान
करावे लागेल. स्नान आटोपल्यावर याच रस्त्याने परतीचा प्रवास भाविकांना करावा लागेल.
ब्रम्हा व्हॅली वाहनतळापासून बसने खंबाळेपर्यंत पोहोचावे लागेल.
§ मुंबई घोटीकडून येणारे
भाविक पहिने बाह्य वाहनतळावर वाहने थांबवून एस.टी. महामंडळाच्या बसद्वारे पेगलवाडी येथील अंतर्गत वाहनतळावर पोहोचतील. तेथून पायी पेगलवाडी रोड
- पेगलवाडी फाटा – नाशिक त्र्यंबकेश्वर
रोड– श्री स्वामी समर्थ रिंग रोड – स्वामी समर्थ केंद्र - निरंजनी आखाडा
(उजव्या बाजुने) जाऊन पुढे गोरक्षनाथ घाटावर स्नान करतील. स्नानानंतर गोरक्षनाथ घाटाच्या उत्तरेकडून पायी
त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर-नाशिक रोड, नवीन जव्हार फाटा, पेगलवाडी
फाट्यावरुन पेगलवाडी अंतर्गत वाहनतळावर यावे लागेल. तेथून बसने पहिने बाह्यवाहनतळावर
पोहोचता येईल.
§ गिरणारे
– रोहिलेकडून त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भविकांना तळवाडे बाह्य वाहनतळावर वाहने थांबवावे लागतील. तेथून तुपादेवी
येथील अंतर्गत वाहनतळापर्यंत बसने जाता येईल. तेथून पायी नाशिक त्र्यंबक रोड, पेगलवाडी फाटा मार्गे जाऊन
आचार्य श्री श्री चंद्र घाटावर स्नान करता येईल. स्नानानंतर परत पेगलवाडी फाटा मार्गे
तुपादेवी अंतर्गत वाहनतळापर्यंत जाता येईल, पुढे बसने तळवाडेच्या बाह्य वाहनतळावर पोहोचावे
लागेल.
§ ठाणे, जव्हारकडून
त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांना
अंबोली बाह्य वाहनतळावर वाहने थांबवून पुढे सापगावच्या अंतर्गत वाहनतळापर्यंत भाविकांना
एस.टी. बसने जावे लागेल. तेथून पुढे पायी गणपत बारी, जव्हार-त्र्यंबक रोड उव्या बाजूस,
बिल्वतीर्थ- चौकी माथा, निवृत्तीनाथ रोड, गंगासागर तलाव, एमटीडीसी रोडने अहिल्या घाटावर स्नानास जाता येईल.
एकूणच, भाविकांनी
नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर येथे स्नानासाठी जाताना व परतीचा प्रवास करताना निश्चित
केलेल्या मार्गांचा, वाहनतळांचा आणि
स्नानांसाठी घाटांचा वापर केल्यास गर्दीचे आणि वाहनांचे व्यवस्थापन होईलच, शिवाय
प्रत्येक भाविकाला या पवित्र पर्वणीत शाही स्नानाचा आनंद घेणे सोयीचे होणार आहे, हे
निश्चित…
-किशोर
गांगुर्डे


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा