आपत्तीप्रसंगात तातडीने पोहोचणार ‘फायर ब्रिगेड’
सहा कायम व चार तात्पुरत्या अग्निशमन केंद्रांसह २२ पथके कार्यरत
नाशिक, दि. १२- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी नाशिक
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने कंबर कसली असून अत्याधुनिक उपकरणे आणि वाहनांसह आपत्तीप्रसंगी कमाल २ ते ३ मिनिटाच्या आतच तातडीने प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली आहे.
नाशिक शहरातील ६ अग्निशमन केंद्र तसेच साधुग्राममधील ४ तात्पुरत्या अग्निशामक केंद्रांसह विविध भागात २२ पथके कार्यन्वित करण्यात येणार आहे. त्याशिवाय दोन
रेस्क्यू व्हॅन शोध व बचाव पथकांसह
तैनात करण्यात येणार आहेत. फायर इंजिनियरिंगचा एक वर्षाचा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी युवकांनाही युवकांनाही या कुंभमेळ्यात सहभागी करुन घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आग,
पूर, चेंगराचेंगरी, रासायनिक वायूगळती
आदी दुर्घटनांचा विचार करता महापालिकेच्या अग्निशमन दलात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. त्याचसोबत अग्निशामक दलामध्ये
क्विक रिस्पॉन्स
व्हेईक्ल्स, ब्रिदिंग
ऑपरेटस व्हॅन, रेस्क्यू
उपकरणे, ॲडव्हान्स्ड
इमर्जन्सी रेस्क्यू
व्हॅन, फ्लड
रेस्क्यू व्हॅन आदी अत्याधुनिक वाहने व उपकरणे अग्निशामक
दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्याशिवाय
अरुंद बोळ, गर्दीची ठिकाणे
आदी ठिकाणी तातडीने प्रतिसाद देण्यासाठी मोटारसायकलवर बांधलेले वॉटर मिस्ट युनिट, अंधारामध्ये प्रकाशयोजना करण्यासाठी इन्फ्लॅटेब्ल लायटिंग मास्ट, पोर्टेबल लायटिंग सिस्टिम अशी यंत्रसामुग्री अग्निशामक
दलाला उपलब्ध झाली आहे.
नदीच्या पाणीपातळीत
वाढ झाल्यास जलसंपदा विभागाशी समन्वय साधून ते इतरत्र वळविण्याबरोबरच घाट आणि नदीकाठी
पोहणाऱ्यांचे
जीवरक्षक पथक फ्लड रेस्क्यू लॉंचर, लाईफ रिंग्ज, लाईफ जॅकेटस, फायबर व रबर बोटस्
आदी आवश्यक जीवरक्षक साहित्यासह तैनात ठेवले जाणार आहे. अशा आपत्तीच्या
वेळी नाग़रिकांना एका ठिकाणी जमविण्यासाठी जागेची आणि नंतर पुनर्वसनासाठी स्थळेही निश्चित केली आहेत, असे नाशिक महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले.
गर्दीच्या वेळी
अग्निशमन बंब तात्काळ पोहोचण्यासाठी प्रशासकीय राखीव मार्गाचा वापर केला जाणार आहे. शहरातील ६ अग्निशमन केंद्रांबरोबरच कुंभमेळ्याच्या काळात साधुग्राम, बाह्य वाहनतळे, अंतर्गत वाहनतळे, भाविक थांबणारे क्षेत्र (स्टेजिंग एरिया) आदी ठिकाणी तात्पुरती अग्निशमन केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
त्र्यंबकेश्वर येथेही
अग्निशमन दलाची ८ पथके व एक रेस्क्यू
व्हॅन कार्यन्वित करण्यात येणार असून वाहनतळांवर देखील पथके ठेवण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथील अग्निशामक दलाची सहजबाबअदारी एमआयडीसीचे विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. मिलिंद ओगले यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कुठल्याही आपत्तीला
तोंड देण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सज्ज झाली असून अनेक ठिकाणी या यंत्रणेने मॉकड्रिल घेतले आहे. २१ वर्ष पूर्ण
झालेल्या युवा-युवतींना ‘स्वयंसेवक’ म्हणून एकदिवसीय प्रशिक्षण दिले आहे. आपत्तीच्या काळात
अग्निशमन दलाच्या १०१
या क्रमांकाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालिन कक्षात १०७७
या क्रमांकावर हेल्पलाईनवर देखील नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. कुंभमेळा काळात नाशिक अग्निशामक दलाच्या सहाय्यासाठी पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर, जळगाव, धुळे, मालेगाव आदी महानगरपालिकांचे तसेच एमआयडीसी, सिडको या प्राधिकरणाचे अग्निशमन
बंब त्यांच्या पथकासह उपलब्ध होणार आहेत.
00000
किशोर
गांगुर्डे, जिल्हा
माहिती कार्यालय, नाशिक १२ ऑगस्ट २०१५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा