सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दर्जेदार सुविधांची निर्मिती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्र्यंबकेश्वर, दि.१९ - नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे
सुरु झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांसह भाविकांसाठी
दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात आल्या असून या सुविधा पुरवितांना त्यात कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरु गोरक्षनाथ महाराज मठातील नवनाथ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते
बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी
भुसे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित
शहा, प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे-पाटील, खासदार
सर्वश्री हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, डॉ. सुभाष भामरे, आमदार
देवयानी
फरांदे,
सीमा
हिरे,
बाळासाहेब
सानप आदी मान्यवरांसह गोरक्ष पीठाधीश्वर श्री महंत योगी आदित्यनाथ महाराज, बाबा मस्तनाथ पीठाधीश्वर श्री महंत चांदनाथजी योगी महाराज आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, कुंभमेळा जगाच्या श्रद्धेचे प्रतीक असून विश्वशांती, प्रेम, सद्भाव
यातून संस्कृती दर्शविणारा हा महाउत्सव आहे. त्र्यंबकेश्वरनगरी ही पावनभूमी
असून नाथ संप्रदायाचे नाशिक-त्र्यंबकेश्वरशी नाते जोडले
आहे. भगवान त्र्यंबकेश्वराच्या
आणि साधू-महंतांच्या आशीर्वादाने
कुंभमेळा यशस्वी होईल, त्यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन संकटांचा सामना करण्याची ऊर्जा, आशीर्वाद
यातून
मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्यात कोणतीही कमतरता भासणार नाही. पोलीस, महसूल प्रशासनाबरोबरच पालकमंत्री श्री.
महाजन
यांनी चांगले काम केल्यामुळे दर्जेदार सुविधा निर्माण झाल्याचे सांगून त्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.
घाट
आणि चौकाचे
नामकरण
त्र्यंबकेश्वर येथील नवीन तहसील कार्यालयामागे नव्याने बांधण्यात आलेल्या घाटाचे ‘नवनाथ घाट’ आणि त्याजवळील
चौकाचे ‘महायोगी गुरु गोरखनाथ चौक’ असे नामकरण
करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या
हस्ते विभागीय आयुक्त एकनाथ डवले आणि जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांचा सत्कार करण्यात आला.
000000
किशोर गांगुर्डे, त्र्यंबकेश्वर, १९ ऑगस्ट २०१५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा