मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला साधू-महंतांशी संवाद
त्र्यंबकेश्वर,
दि. १९- येथील निरंजनी आखाड्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी उपस्थित साधू-महंतांशी संवाद
साधला. कुंभमेळा सुरु झाला असून पर्वणीचे महत्त्वाचे दिवस देखील जवळ आले आहेत. आपल्या सर्वांचे उत्तम योगदान लाभलेले आहे. यापुढेही ते
लाभेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री गिरीष
महाजन, नगराध्यक्षा अनघा
देशपांडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, खासदार हरिश्चंद्र
चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप,
देवयानी
फरांदे,
सीमा
हिरे आदींसह महंत श्री हरिगिरीजी महाराज, महंत श्री सागरानंदजी सरस्वती महाराज, महंत श्री नरेंद्रगिरीजी महाराज, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकार केवळ सुविधांची निर्मिती करीत आहे, कुंभमेळ्यात साधू-महंतांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध कामांची, सुविधांची उभारणी पूर्ण झाली असून जी कामे बाकी असतील ती तातडीने पूर्ण केली जातील, त्यात कोणतीही कमतरता ठेवणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री. अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथील
सर्वच
आखाड्यांनी कुंभमेळा साजरा करण्याचे आवाहन करुन कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या चांगल्या कामांबद्दल महाराष्ट्र
शासन, मुख्यमंत्री श्री. फडणवीस, पालकमंत्री श्री. महाजन यांची प्रशंसा केली. साधू-संत-महंतांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी यंत्रणेतील
प्रत्येक घटकाने अविरत प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांचेच श्री. शहा यांनी शुभेच्छा देऊन कौतूक केले.
जिल्हाधिकारी श्री. कुशवाह आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कुंभमेळ्यासाठी चांगले सहकार्य लाभत असून या सर्वांचे
याप्रसंगी
महंत हरिगिरीजी महाराज यांनीही कौतूक केले. तर
अधिकारी खूप चांगले काम करत असून साधू, महंतांबद्दल त्यांची सहकार्याची भावना आहे. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मांडलेली हरितकुंभाची
संकल्पना यामुळे निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास महंत सागरानंदजी महाराज यांनी यावेळी व्यक्त केला.
000000
किशोर गांगुर्डे, त्र्यंबकेश्वर १९ऑगस्ट २०१५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा