प्रसारमाध्यमांच्या सुविधेसाठी पर्वणीकाळात नाशिक व त्र्यंबकेश्वरात तीन राष्ट्रीय माध्यम केंद्र

नाशिक, दि. 5:- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या काळात प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने नाशिक शहरात रामकुंड आणि साधुग्राम येथे तर त्र्यंबकेश्वरच्या नवीन तहसील कार्यालयात राष्ट्रीय माध्यम केंद्र कार्यन्वित करण्यात आले आहे. पर्वणीकाळात तीन दिवस सुरु राहणाऱ्या या माध्यम केंद्रांचा प्रसारमाध्यमांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्वणीकाळात वृत्तांकनासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वरला येत असतात. त्यांना बातम्या, फोटो, व्हिडीओ त्यांच्या संस्थेकडे पाठविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात म्हणून राष्ट्रीय माध्यम केंद्रांची उभारणी करण्यात येते. नाशिक येथे रामकुंडाजवळच्या खिमजी भगवानदास आरोग्यधाम आणि  साधुग्राममध्ये तसेच त्र्यंबकेश्वरच्या नवीन तहसील कार्यालयात  सर्व सुविधांयुक्त असे माध्यम केंद्र पर्वणीच्या काळात उभारण्यात आले.  ब्रॉडबॅण्ड जोडणी असलेले इंटरनेट, वाय-फाय, संगणक, प्रिंटर्स, फॅक्स, दूरध्वनी सुविधा, पत्रकारांना माहिती देण्यासाठी ब्रिफिंग हॉल अशा विविध सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या माध्यम केंद्रांचा पहिल्या पर्वणीत शेकडो माध्यम प्रतिनिधींनी लाभ घेतला.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दुसरी पर्वणी दि. 13 सप्टेंबर रोजी असून नाशिक येथे तिसरी पर्वणी 18 सप्टेंबरला तर त्र्यंबकेश्वरला 25 सप्टेंबरला आहे. प्रत्येक पर्वणीच्या दिवसाबरोबरच एक दिवस अगोदर आणि नंतरचा दिवस असे तीन दिवस हे राष्ट्रीय प्रसारमाध्यम केंद्र सुरु राहणार आहे. राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाचे नाशिक विभागीय उपसंचालक सतीश लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आणि त्र्यंबकेश्वर येथे जळगावचे जिल्हा माहिती अधिकारी किशोर गांगुर्डे हे या माध्यम केंद्रांचे व्यवस्थापन पाहत आहेत.
राष्ट्रीय माध्यम केंद्रांचे सविस्तर पत्ते संपर्क क्रमांक-
§  राष्ट्रीय माध्यम केंद्र, रामकुंड, नाशिक- खिमजी भगवानदास आरोग्यधाम, पहिला मजला, सरदार चौक, मुठे गल्ली, रामकुंडाजवळ, पंचवटी, नाशिक- 422003. दूरध्वनी-0253- 2516631, 2516632, 2516642  

§  राष्ट्रीय माध्यम केंद्र, साधुग्राम,नाशिक-तात्पुरते पोलीस नियंत्रण कक्षाशेजारी, लक्ष्मीनारायण मंदिर चौक, तपोवन, नाशिक- 422013. दूरध्वनी- 0253-2516614, 2516617, 2516623

§  राष्ट्रीय माध्यम केंद्र, त्र्यंबकेश्वर- नवीन तहसील कार्यालय इमारत, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक- 422 212. दूरध्वनी - 02594- 234347, 234348, 234349

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Excellent response from passengers for Railway Ticket Reservation Mobile Van

‘सिंहस्थ संवाद’ : महान्यूजच्या माध्यमातून

कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीची माहिती देणारी ‘सिंहस्थ संवाद’ मालिका सोमवारपासून आकाशवाणीवर